परिचय

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण सिंधुदुर्ग विभागाचे संकेतस्थळ नागरिकांसाठी उपलब्ध करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. या संकेतस्थळाद्वारे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी लागणारे पात्रता निकष, प्रादेशिक व क्षेत्रीय कार्यालयांची माहिती, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क (ई-मेल, दूरध्वनी व पत्ता) या सर्व बाबींचा एकत्रित परिचय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील आश्रमशाळा, नामांकित शाळा व निवासी शाळांची माहिती सहज मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. शासनाचे महत्त्वाचे निर्णय, परिपत्रके तसेच विभागाशी संलग्न इतर शासन विभागांचे संकेतस्थळ दुवे (links) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती मिळू शकेल. भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा आमचा मानस आहे. या दृष्टीने, नागरिकांनी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना आम्हाला [ई-मेल पत्ता] वर पाठवावेत. त्यानुसार संकेतस्थळात आवश्यक सुधारणा करून ते अधिक परिणामकारक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संकेतस्थळ जनतेसाठी उपयुक्त, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.

श्री. दिलिप राठोड
प्रादेशिक उप संचालक इतर मागास बहुजन कल्याण मुंबई विभाग

अधिक वाचा … >>